सम्यक समीक्षा / दैनिक सम्राट दि. ९ जून २०११
आंबेडकरी विचाराचा
माणूस घडविण्यासाठीचा कृतीकार्यक्रम:
जय भीम बोलो...
तुषार ठोंबरे
प्रातांधिकारी, इचलकरंजी (जि.कोल्हापूर)
प्रातांधिकारी, इचलकरंजी (जि.कोल्हापूर)
दै. "वृत्तरत्न सम्राट' च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीचे उपसंपादक सिद्धार्थ कांबळे यांच्या "जय भीम बोलो...' या पुस्तकाचे "उपराकार' पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले.या पुस्तकातील लेख यापूर्वी दै. "वृत्तरत्न सम्राट' मध्ये "जय भीम बोलो...' या सदरात प्रसिध्द झाले होते. त्याच वेळी ते सदर अतिशय लोकप्रिय झाले होते.त्यामुळे शिर्षक तेच ठेऊन हे लेख एकत्रित करुन पुस्तकरुपाने प्रकाशित केले आहेत.सिद्धार्थ यांच्या लेखणीतून जे काही लेख प्रसिद्ध झाले आहेत त्या लेखांचे केवळ संकलन किंवा विचार प्रबोधन करणारे हे पुस्तक नसून डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस घडविण्यासाठी आवश्यक असणारा समाजाला दिलेला कृतिकार्यक्रम आहे.
जय भिम बोलो हे केवळ आंबेडकरी चळवळीचे तथाकथित अभिनिवेशी दर्शन नसून तथागत गौतम बुद्धांच्या "अत्त दीप भव' म्हणजे "स्वयं प्रकाशित व्हा' त्याच बरोबर "एहिपस्सिको' म्हणजे "या व पहा',अनुभव घ्या व अनुभवाच्या आधारावर बुध्दीप्रामाण्याच्या कसोटीवर आपल्या आचरणाची पडताळणी करा, असा स्पष्ट विचार आधोरेखीत करणारी,सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक सूक्ष्म निरीक्षणे सिद्धार्थ कांबळे या पुस्तकात नोंदविताना दिसतात. आंबेडकरी तत्त्वज्ञानाचा अंगिकार केलेल्या धम्म बांधवाचे नेमके वर्तन कसेे असू नये यावर नेमकेपणाने बोट ठेवताना बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीच्या दिशेने मार्गस्थ करण्याची उर्मी या लेखणीतून पोहचेल, हा आशावाद पुस्तकातील प्रत्येक लेखागणिक बळकट होत जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा फुले, राजर्षी शाहू यांचे नाव उठता बसता घेणाऱ्या व आचरणाने मात्र मनुवादी असणाऱ्या तसेच परंपराचे जोखड वाहणाऱ्या दांभिकतेवरती सडकून केलेला प्रहार म्हणजे हे पुस्तक आहे. त्याचबरोबर झोपलेल्यांना जागे करणारा तर आहेच, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याचे सोंग उघड करणारा हा एक प्रयत्न आहे.बाबासाहेबांच्या विचारांचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू असलेला माणूस घडवायचा असेल तर, त्याच्यासाठी आपण काय केले पाहिजे? हे या पुस्तकात सांगितले आहे.आपण आपमतलबी असता कामा नये,आपले वागणे दुटप्पी नसावे त्याचबरोबर बाबासाहेबांनी आपल्या खांदयावर टाकलेली जबाबदारी पार पाडत असताना आपले वर्तन कसे असावे? याचे अतिशय सुंदर वर्णन सिद्धार्थ कांबळे यांनी या पुस्तकात केले आहे. त्यंाच्या अवती भोवती जी जी माणसं त्यांना भेटत गेली अशा प्रातिनिधिक माणसांच्या मानसिकतेत नेमके काय दडले आहे? याची निरीक्षणे नोंदविण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात या पुस्तकात केवळ निरीक्षणे नाहीत तर बाबासाहेबांच्या आयुष्यातील काही अनुभव, इतिहास घेऊन येणारा काही भागही त्यामध्ये आहे. आंबेडकरी चळवळीचे वर्तमान तर त्यांनी यामध्ये रेखाटलेच आहे. परंतु इतिहासाच्या आणि वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीचे भविष्य कसे असावे? याचे सुध्दा एक सुंदर रेखाटन सिद्धार्थ कांबळे यांनी या पुस्तकात केले आहे म्हणून चळवळीच्या दृष्टीने हे पुस्तक अत्यंतिक महत्त्वाचे आहे. बुध्दीजीवी वर्गाची किंवा डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये असणाऱ्या माणसांचीही जबाबदारी आहे की, संपूर्ण समाजाला त्यांना सामुदायिक नेतृत्व देता आले पाहिजे.
चळवळीच्या बाबतीत काय झाले? काय होत आहे? हे गेल्या 50 वर्षात आपण पाहिलेले आहे हेच सांगण्यासाठी सिद्धार्थ कांबळे यांनी "मतलबीपणा सोडायला हवा' या लेखात डॉ. बाबासाहेब आणि नानकचंद रत्त्तू यांचा संवाद दिलेला आहे. बाबासाहेब एकदा ढसाढसा रडले तेव्हा त्या रडण्याचे कारण रत्तूनी बाबासाहेबांना विचारले. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, "माझी जनता राज्यकर्ती झालेली मला पहायच होतं, पण ते स्वप्न पूर्ण होईल असे वाटत नाही. माझ्या नंतर हा सगळा गाडा पुढे नेईल असा एकही माणूस मला आजतरी दिसत नाही." बाबासाहेबांचा गाडा पुढे नेण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याची शक्यता या पुस्तकात नक्की आहे.
या पुस्तकातील ज्या ज्या ठिकाणी त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा धागा घेऊन निरीक्षणाच्या संदर्भात काहीतरी नोंदविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे स्पष्ट होते की, सिद्धार्थ कांबळे यांचे बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाबद्दलचे किंवा आंबेडकरवादाबद्दलचे जे काही आकलन आहे ते अचूकतेच्या दिशेने आहे. पहिली पायरी हीच आहे की, आकलन जर पक्के असेल तर त्याबद्दलचा आपला विचार अचूक असू शकतो, विचार अचूक असेल तर उच्चार अचूक असू शकेल आणि आपला उच्चार अचूक असेल तर आपला आचार सुद्धा अचूक असू शकतो. त्या दृष्टीकोणातून त्यांच्या आकलनाच्या संदर्भात या ठिकाणी ज्या शक्यता आहेत, त्या या पुस्तकात व्यक्त झाल्या आहेत. त्या संपूर्ण चळवळीला अत्यंत आशादायी स्वरुपाच्या आहेत. हे पुस्तक नसून सगळ्यांनी आपआपल्याबद्दल आणि एकमेकांबद्दल बोलावे एवढे "पोटेशिंयल' त्यांनी या पुस्तकात निर्माण करून ठेवले आहे.
"हा तर पुरोहितवादच' या लेखात त्यांनी पांढरी वस्त्रे परिधान करून केल्या जाणाऱ्या कर्मकांडावरही प्रहार केला आहे. समाजात मेणबत्तीमध्ये, पांढऱ्या कपड्यामध्ये आणि मंगळसुत्रातील मणी व डोरल्यांऐवजी अशोकचक्रात अडकलेली माणसे आपल्याला दिसतात. 14 एप्रिल, 6 डिसेंबर, 14 ऑक्टोंबर या तीन दिवसासाठी आपण पांढरी वस्त्रे परिधान केली म्हणजे आपण बौद्ध होत नाही. बुद्ध मूर्तीला आपण लावलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशाची गरज नाही, कारण स्वयंप्रज्ञेने, तेजाने झळाळणारे ते व्यक्तिमत्व आहे, ते अखंड विश्र्वाला हजारो वर्षे प्रकाश देत आहे, यापुढे देखील करोडो वर्षे प्रकाश देईल. मूळ मुद्दा असा आहे की, बाहेर प्रज्वलीत केलेल्या मेणबत्तीचा थोडातरी प्रकाश आपल्या अंतकरणात उतरणार आहे का? जर तो प्रकाश आपल्या अंतकरणात उतरणार नसेल तर मग बाहेर कितीही झगमगाट असला तर अंतकरणात जो अंधार आहे त्या अंधाराचे, काय ? या दांभिकतेवर सिद्धार्थ कांबळे यांनी प्रहार करण्यासाठी "जय भीम बोलो..' हे उत्तम माध्यम निवडले आहे. हे पुस्तक सर्वांनी गांभीर्याने वाचावे त्या बद्दलची आपली निरीक्षणे आपण लिहून ठेवावी, या पुस्तकात ज्या प्रवृत्तीवर प्रहार केला आहे, त्या प्रवृत्तीच्या जवळपास आपण कुठे जात नाही ना? हे चाळून पाहण्यासाठी निकष आणि पॅरामिटर म्हणूनसुद्धा या पुस्तकाचा विचार करू शकतो.
पुस्तकाचा आकार जरी छोटा असला तरी या एका पुस्तकातून भविष्य काळामध्ये आंबेडकरी तत्त्वज्ञानावरतीसुद्धा ते अधिक चांगल्यापद्धतीने लिहू शकतील असा अशावाद या पुस्तकातील लेखामधून ठामपणे दिसून येतो. लेखामधील भाषा ही सर्वसामान्यांच्या संवादाची व दैनंदिन जीवनातील वापराची असल्याने त्यांना काय म्हणायचे आहे हे स्पष्टपणाने वाचकापर्यंत पोहचविण्यात ते यशस्वी ठरले आहेत. अनेक लेखांतून अनेक पातळीवरची अनेक व्यक्तीमत्वे चतुराईने लेखांतून व्यक्त करून त्यांनी समाजातील तथाकथितांची आत्मचिंतनाची गरज अधोरेखीत केली आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये घडणाऱ्या अनेक घटनांचा लेखा-जोखा मांडून चळवळीला दिशा देण्याचे एक काम या माध्यमातून होणार आहे. आंबेडकरी तत्वज्ञानाचा व कृतीकार्यक्रमांचा तात्विक व व्यावहारिक वेध घेणाऱ्या अनेक शक्यता यातून व्यक्त झाल्या आहेत त्या फलद्रूप होवोत यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा !

पुस्तक : जय भीम बोलो, लेखक : सिद्धार्थ कांबळे
प्रकाशन : नाग नालंदा, इस्लामपूर ता. वाळवा,
जि.सांगली.मोबाईल : 9881035803
पृष्ठे : 96, मूल्य : रु. 60

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा